म. गांधीजींच्या सत्याग्रहाची ओळख
Authors/Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक तथा विभागप्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय, देवणी जि. लातूर ४१३५१९ महाराष्ट्र, भारत
Description
महात्मा गांधी सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्न सोडविण्यात आणि अन्याय-अत्याचार, जुलूम, शोषण व दडपणूक यांचा अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करण्यामध्ये तज्ञ होते. केवळ आदर्श विचार किंवा कार्यक्रम मांडून ते समाधान मानत नसत वा स्वस्थ बसत नसत, तर मांडलेला आदर्श प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असत. त्यामुळे त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना वंशवादाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला. भारतामधील जुलमी ब्रिटिश सत्ता घालविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ब्रिटिश सत्ताधीश अर्ज-विनंती मार्गाला जुमानणार नाहीत, हे त्यांनी नेमकेपणाने ओळखले होते. तो मार्ग त्यांना उपयुक्तही वाटत नव्हता. म्हणून ते दिनेश वांच्छा यांना लिहिलेल्या एका पत्रात लिहितात, "I think the growing generation will not be satisfied with petitions. We must give them something effective." त्यांना चळवळीसाठी अर्ज-विनंतीपेक्षा दुसरे एखादे शस्त्र हवे होते. ते त्यांनी सत्याग्रहाच्या रुपाने भारतीयांना व जगाला दिले.
सत्याग्रहाच्या रुपाने म.गांधीनी एकीकडे युध्दाला व हिंसाचाराला पर्याय दिला तर दुसरीकडे भारतातीलच नव्हे तर संपूण्र जगातील शोषित, पीडित, परतंत्र, दु:खी व दुर्बल माणसाच्या हातात अन्यायाच्या विरोधात लढण्याचे धारदार व लखलखीत शस्त्र दिले. सत्याग्रहामुळे पाशवी शक्तीचे बळ कमी होते आणि सामान्यांचे अन्यायाच्या विरोधात लढण्याचे बळ वाढते. सत्याग्रहात वैयक्तिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्याची सुप्त शक्ती असते. सत्याग्रहाद्वारे कोणत्याही प्रकारचे मतभेद व तंटे मिटविता येतात. म्हणून म.गांधीनी सत्याग्रह म्हणजे समस्या किंवा प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली आहे. "कारागिर अलिकडे एक प्रकारची किल्ली बनवितात ती सर्व प्रकारच्या कुलपांना चालते. ते तिला 'मास्टरकी' म्हणतात. तसेच 'सत्याग्रह' ही आपल्या अगणित आपत्तीवरील गुरुकिल्ली आहे', असे गांधीजी म्हणतात."
Files
20230104435438115.pdf
Files
(641.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:027d92db96a6208748a3b63b3c02ca47
|
641.6 kB | Preview Download |