महात्मा गांधीजींचे स्त्री विषयक विचार
Authors/Creators
- 1. विभाग प्रमुख, मराठी विभाग, उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम ४४४५०६ महाराष्ट्र, भारत
Description
साधी राहणी उच्च विचारसरणी असे जीवन विषयक तत्त्व असणारे,नैतिकता हा जीवनाचा मुलाधार मानणारे, अहिंसा धर्माचे प्रवर्तक व मानवतेची पुजारी तसेच श्रेष्ठ तत्त्वचिंतक व समाज सुधारक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी होय.राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सामान्य माणसाला आदर्श जीवन जगता यावे याकरिता सत्य अहिंसा सत्याग्रह सर्वधर्मसमभाव ही तत्वे जगाला दिली त्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी हाच त्यांचा उदात्त हेतू होता.महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत - पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.
Files
20230104313317092.pdf
Files
(790.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:cf8ef25a49662401fc168b8f791febcb
|
790.1 kB | Preview Download |