Published October 28, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधी आणि ग्रामीण स्वराज्य

  • 1. प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बी. रघुनाथ महाविद्यालय, परभणी ४३१४०१ महाराष्ट्र, भारत
  • 2. प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, स्वा. सै. सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा (जं.) जि. परभणी ४३१५११ महाराष्ट्र, भारत

Description

मागील तीन ते चार वर्षात संपूर्ण विश्वाला ज्या कोरोनाच्या महामारीने ग्रासले होते त्याचा परिणाम हा केवळ सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबीवरच झाला नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला देखील व्यापले आहे. याच दरम्यान संपूर्ण जगाला कळून चुकले की आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वावलंबन आणि स्वदेशीचा मोठा वापर होणे आवश्यक आहे असे संपूर्ण जगाला वाटू लागले. सोबतच स्थानिक उत्पादन, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक संबंध यांची साखळी मजबूत असणे आवश्यक आहे याची आवश्यकता निर्माण झाली. याचाच अर्थ असा की, कोरोना सारख्या संकटाने उपस्थित झालेल्या परिस्थितीने संपूर्ण जगाला कळून चुकले की, महात्मा गांधींच्या 'ग्रामीण स्वराज्य' या संकल्पनेचा गंभीरतेने विचार करायला हवा. महात्मा गांधींनी फार पूर्वीच सांगितले होते की, "भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ पूर्ण भारताची स्वतंत्रता असावी आणि याची सुरुवात खालून वरती म्हणजे खेड्यातून शहराकडे व्हावी. प्रत्येक गांव स्वतंत्र असेल. प्रत्येक गांव आत्मनिर्भर आणि सक्षम व्हावे." महात्मा गांधींनी आपल्या या स्वप्नाला साकार करण्यासाठी भारतात ग्राम पंचायती आणि ग्रामसभा या स्थानिक विकास आणि स्थानिक प्रशासन यांचा मुख्य आधार असायला हवे असे मत प्रतिपादन केले होते.

Files

20230105144147059_c.pdf

Files (205.3 kB)

Name Size Download all
md5:49aa1f9cc045eded0e7dd1b512e3eaac
205.3 kB Preview Download