महात्मा गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना
Authors/Creators
- 1. मराठी विभाग, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड ४३१७१९ महाराष्ट्र, भारत
Description
धर्म, नीती, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, कायदा, शेती असे कोणतेही क्षेत्र असो गावापासून विश्वापर्यंत प्रचंड मोठा आवाका गांधी विचाराने व्यापला आहे. मानवावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व प्रक्रियांचे सुक्ष्म निरीक्षण करून त्यांचे मूलगामी चिंतन गांधीजींनी केले होते. या अनुषंगाने वरील विषयांच्या संदर्भात शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामस्वराज्याची व्याख्या करताना महात्मा गांधी म्हणतात की, लोकांच्या संमतीने होणारे भारत वर्षातील शासन. लोकांच्या संमतीने हे शासन देशवासीयांच्या मताधिकारांच्या प्रयोगावर आधारित असेल.
आज ज्या पद्धतीने भारतातील खेड्यांची दुरावस्था झालेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या प्राचीन काळातील खेड्यात परिस्थिती खूप चांगली होती. खेड्यातील लोकांचे जीवन सुखी व समृद्ध होते. ग्रामीण समुदाय स्वावलंबी जीवन जगत होता. प्रत्येक खेड्याने स्वत:ची मजबूत व्यवस्था उभी केलेली होती. पंचायत ही खेड्यात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली एक संस्था असून तत्कालीन प्रत्येक खेडेगाव हे गणराज्य होते. ग्रामीण भागातील उद्योग चांगले चालत असत. खेडी स्वयंपूर्ण व स्वयंशासित बनलेली होती. गांधीजीच्या या काळाला ग्रामगणराज्यांचा सुवर्णकाळ मानले होते.
भारतात ब्रिटिश साम्राज्यामुळे पाश्चिमात्यकरणाच्या प्रक्रियेस सुरूवात झाली. साम्राज्यवादी शासनाने आर्थिक शोषणाची व्यवस्था खेडेगावांपर्यंत पक्की केली. अर्थसत्ता व राजकीय सत्तेचे शहरात केंद्रीकरण केले. परिणामी विक्रेंदीकरणावर आधारित असणाऱ्या ग्रामव्यवस्थेला सुरूवात झाली. पाश्यिमात्यकरणामुळे भारतात उभ्या राहिलेल्या शहरांनी खेड्यांचे शोषण करणे सुरू केले. स्वावलंबी असणारी खेडी परावलंबी बनवली व त्यामुळे ग्रामीण जीवनाला उतरती कळा लागली. गांधीजींच्या म्हणण्यानुसार भारत हा खेड्यांचा देश आहे आणि जोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही.
Files
202301058084046_c.pdf
Files
(214.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:921e7856cbb25ec9fccce8773d2f331d
|
214.2 kB | Preview Download |