Published October 26, 2023 | Version v1
Journal article Open

महात्मा गांधीजी आणि ग्रामस्वराज्य

  • 1. शिवाजी महाविद्यालय, रेणापूर जि. लातूर ४१३५२७ महाराष्ट्र, भारत

Description

महात्मा गांधींजींची स्वराज्य ही कल्पना आदर्शाकडे जाण्याची एक पायरी आहे तसेच आदर्शापर्यंत जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी, राजसत्तेच्या महत्वकांक्षेचा पूर्ण अभाव असलेला अहिंसक समाज निर्माण करण्याकरीता विकेंद्रीकरण हाच एकमेव उपाय होता. गांधीजींनी आपल्या ग्रामराज्याच्या कल्पनेत ग्राम हा नियोजनाचा केंद्रबिंदु मानला होता ग्रामीण नियोजनाला जी काही मदत लागेल ती देणे होय. एवढे केंद्रसत्तेचे काम आहे असे गांधीजींना अभिप्रेत होते. महात्मा गांधीच्या मते खय्रा भारताचे दर्शन शहरा मध्ये नाही तर खेडयामध्ये घडते. त्यामुळे प्रत्येक खेडे हा या नव्या रचनेचा केंद्रबिंदु असले पाहिजे. भारतातील स्वायत्त असलेली खेडी स्वयस्फुर्त सहकार्यांच्या बळावर आपापल्या गरजाभागवू शकतील. त्यामुळे प्रतिष्ठापूर्ण व शांततामय सहजीवन व्यतीत करता येईल.

भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवात तळागळातील घटकापासून व्हावी असे गांधीजीना अभिप्रेत होते. भारत हा खेडयांचा देश आहे. महात्मा गांधींजीच्या म्हणतात देशभरातील खेडयांचा विकास झाला तरच संपूर्ण भारत देशाच्या विकास होईल. जनतेचे कल्याण करण्यासाठी हे राज्य जनतेचे असणे आवश्यक असते. म्हणून भारताने लोकशाही पध्दतीचा स्विकार केला होता. गांधीजीं यांच्या विचारातील ग्रामस्वराज्य संकल्पनेत खेडयांचा विकास हाच केंद्रबिंदु होता. विकेंद्रीत लोकशाहीचा पुरस्कार करून त्यांनी आदर्श अशा ग्रामराज्याची कल्पना मांडली. महात्मा गांधींच्या मते शहरीकरण व उद्योगधंदे यांच्या वाढीमुळे उद्योगधंदे ज्यांच्या मालकीचे त्यांच्याच हातात संपत्तीचे केंद्रीकरण होते ते टाळण्यासाठीच स्वराज्यात खेडयांना स्वायत्तता दिली पाहिजे.

Files

202301053538037_c.pdf

Files (224.5 kB)

Name Size Download all
md5:45d08636199e1d83905eb6ba24dcef2d
224.5 kB Preview Download