Published March 31, 2023 | Version v1

सेखोजी आंग्रे व बाजीराव पेशवे यांच्या संबंधाचा अभ्यास

  • 1. आचार्य पदवी संशोधक, शि. प्र. मं. ता. म. कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली ता. चिखली, जि. बुलढाणा

Description

कान्होजी आंग्रे जिवंत असे पर्यंत त्याचे शत्रू सुखाने झोप घेऊ शकत नव्हते.  कान्होजी या नावाचा परकीय सागरी शत्रूंना दरारा वाटत होता.  मराठ्यांच्या नौदलाचा निर्माता शिवछत्रपती यांच्या राजनीतीचा परिपाक तसेच आरमारी सामर्थ्याचा परिपाक होता.  शिवरायांच्या विचारांची प्रेरणा समग्र महाराष्ट्रातून  हिंदुस्थानात प्रकाशत होती.   कान्होजी आंग्रे जिवंत असे पर्यंत परकीय सागरी शत्रूंचे त्याचा पुढे काही चालले नव्हते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात कोकण किनाऱ्यावर परकीय सागरी शत्रूंना पाय लागू न देण्याचा कामी जर कोणी पराकाष्ठेची दक्षता दाखविली असेल तर ती फक्त कान्होजी आंग्रे याने, असे म्हटल्यास अतिशायोक्ती ठरणार नाही.

मराठा आरमाराचा सरखेल कान्होजी आंग्रेचा मृत्यू इ.स. १७२९ च्या जुलै मध्ये झाला.  कान्होजीच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील महाकाव्याचा एक उज्ज्वल मार्ग समाप्त झाला होता.  कान्होजी आंग्रेच्या तीन पत्नीपैकी राजूबाई उर्फ मथुराबाई हिचा सेखोजी पुत्र होता.  कान्होजीच्या मृत्यू पश्चात अवघ्या सतरा दिवसात तारीख २१ जुलै १७२९ रोजी सरखेलीचा कारभार छत्रपती शाहू महाराजांनी दिला.  या सरखेलीचा कार्यांने सेखोजी आंग्रें याचे मराठा राज्याचे  पंतप्रधान यांचाशी संबंध येऊ लागले.

Files

9.pdf

Files (316.0 kB)

Name Size
md5:0fa3f5567f1fef6775c5ff1b518bdd7f
316.0 kB Preview Download