भारतीय संगीत जगतात स्त्रियांचे योगदान
Description
संगीत क्षेत्रात महिलांचे बहुमुखी योगदान आहे.गीत , वाद्य आणि नृत्य या तीनही क्षेत्रात महिला कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्त्री-सुलभ सुंदरतेने जिथे महिलांनी जन-माणसाना आकृष्ट केले आहे. तसेच आपल्या भावपूर्ण मुद्रानीअनेक नृत्य भागिमांचीनिर्मिती केली.स्त्री-कंठ स्वभावता मधुर मानल्या जातो. गायन प्रस्तुत करताना तिच्या आवाजातील लवचिकपणा तिच्या गायनाची सुक्ष्मता द्विगुणीत करते. भारतीय संगीत बरेच प्राचीन असल्याचे लोथनसारखेच प्रवासपट्टण, अप्पर डेक्कन , नागार्जुन कोंडा, ब्रम्हगिरी, साथानवल्लू इत्यादी प्रदेशात उत्खननात जी सामग्री मिळाली ती हडप्पा संकृतीसारखीच आहे. त्यानंतर अंबालानजीक रोपडमध्ये पुरातत्ववेत्तानी जे संशोधन केले त्या संकृतीसोबतसुद्धा प्रौगेतिहासिक हडप्पा संकृतीचा संबंध असल्याचे निदर्शनास आले.