तांबूल सेवनाचे (विड्याचे पान खाणे) प्राचीन व आधुनिक दृष्टीने महत्त्व
Authors/Creators
- 1. पीएच.डी. संशोधक विद्यार्थी
- 2. संस्कृत विभाग प्रमुख्,मू. जे. महाविद्यालय, जळगाव
Description
आयुर्वेद चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून देशात अस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक लहान-मोठ्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरत आहे. पूर्वीच्या काळी मानव निसर्गाच्या सान्निध्यात रहात होता. त्याचे दैनंदिन कार्यक्रम उदा. दंतधावन (दात घासणे), न्याहरी, भोजन, पेयपान, तांबूल (भोजनोत्तर पान खाणे), पाचक औषधे, विविध रोग, प्रसूती, बाळंतपण समारंभ, पूजा-अर्चा वगैरे कार्यक्रमात विविध वनस्पतींचा वापर होत असे. त्यामुळे मानवाला वनस्पतींचा चांगला परिचय होता. प्राचीन भारतीय संस्कृतीची शेती आणि आयुर्वेद ही प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच भारतीयांना तेव्हापासून आयुर्वेदाचे व वनस्पतींचे सखोल ज्ञान होते. मानव दैनंदिन जीवनात अनेक वनस्पतींचा वापर करतो जसे कडूनिंब, कोरफड, हळद, आवळा, भृंगराज, तुळस, अद्रक, नागवेलीचे पान, बेलाची पाने, आंब्याची पाने, मेथीच्या बिया, मसाल्याचे पदार्थ - लवंग, मिरे, वेलदोडे, तेजपान, मोहरी, ओवा, दगडफूल इत्यादी.