महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाच्या निर्यातीचा चिकित्सक अभ्यास
Authors/Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड.
Description
भारतात प्राचीन काळापासून व्यापार महत्त्वपूर्ण असून, प्राचीन काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे तेर आणि पैठण सोबतचा ग्रीक आणि रोमन साम्राज्य सोबत व्यापारा बाबत नोंदी आहेत. व्यापारासाठीचा चीनमधील ‘ सिल्क रोड ’ प्राचीन काळासाठी महत्त्वाचा होता .ब्रिटिशांनी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केल्यानंतर कृषी उत्पादनाची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कारण या काळात भारताला जगात सोने की चिडिया म्हणून संबोधले जात होते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात रशियाच्या साह्याने पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा( रोड मॅप) तयार केला गेला. त्यामध्ये देशातील लोकांची अन्नाची गरज कशी भागविता येईल यादृष्टीने प्रारंभिक दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. स्वामीनाथन आणि इतर संशोधकाच्या, शासनाच्या आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे भारतामध्ये हरित क्रांती घडून आली .त्यामुळे भारत देश कृषी उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला .आज कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे वाढ झाली आहे. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कृषी उत्पादन कसे होईल! या दृष्टिकोनातून संशोधक प्रयत्नशील आहेत. अधिक उत्पादन झाल्यामुळे भारतातील कृषी वस्तू निर्यातीलाही वेग आलेला आहे.
प्रस्तुत शोधनिबंधामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी मालाची निर्यात किती बिलियन आणि मिलियन डॉलर मध्ये झाली. देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा कृषी निर्यातीचा वाटा किती आहे .इतर वस्तूच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात कृषी उत्पादनाची निर्यात मूल्य किती आहे. यासंदर्भात संशोधन प्रस्तुत शोधनिबंधामध्ये करण्यात आलेले आहे.