विधवा स्त्रियांच्या सामाजिक दर्जेत झालेले परिवर्तन : एक समाजशास्त्रीय अभ्यास
Authors/Creators
Description
स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष गणतंत्राची बाहत्तर वर्षे पूर्ण झाली. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, वीज,पाणी आणि सडक यामध्ये आपण प्रगती केलेली आहे. यातील शिक्षणाच्या संख्यात्मक आकडा पाहून चालणार नाही कारण संख्यात्मक आकडा फसवा असतो. तर गुणात्मक परिवर्तन काय झाले हे पाहावे लागते. स्त्री शिक्षणाचा गुणात्मक विचार केला तर शंभरपैकी आठ स्त्रिया कार्यात्मक साक्षर आहेत. ज्या कार्यात्मक साक्षर नाहीत ते आपले प्रश्न सोडवू शकतात का हा एक प्रश्न आहे. म्हणजेच ती आपले जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही तेव्हा विधवांचा प्रश्न किती गंभीर आहे. हे लक्षात येते. मी जे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पाच गावांचे सर्वेक्षण केले त्यामध्ये विधवांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन विवाह, कर्ता पुरुष, जिम्मेदार व्यक्ती विवाहांतून विधवा झाल्यानंतर प्राप्त झालेला नकारात्मक दृष्टिकोन. हा नकारात्मक दृष्टिकोन समाज आजही नष्ट करू शकलेला नाही. विधवा झाल्यानंतर समाजात घरी होणारा आधार आजही कमी आहे तिने सामाजिक व आर्थिक गोष्टींबद्दल बोलू नये. कष्टाची कामे तिने करावी. तिचा अपमान करण्याची संधी किंवा समाज सोडत नाही. पुरुषाला पत्नी मिळाल्यानंतर तो सन्मान समाजामध्ये आहे तो विधवा स्त्रीला नाही. या सर्व गोष्टींचा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो त्यातून एक नकारात्मक दृष्टिकोन कायम राहतो त्यामुळे सामाजिक दर्जा उंचावत नाही. समाजाची सामाजिक सरचना एक विशिष्ट प्रकारे यासाठी कार्य करते. स्त्रीचा दर्जा उंचावण्यामध्ये पितृसत्ता धर्म संस्कृती आणि जातिव्यवस्था एक ग्रामीण समाजामध्ये आजही अडसर ठरत आहे. कार्यात्मक शिक्षण जेव्हापर्यंत स्त्रीला प्राप्त होत नाहीत तेव्हापर्यंत स्त्रियांचे आणि विधवांचे प्रश्न हे सुटू शकणार नाही. त्यासाठी तिला कार्यात्मक साक्षर होऊन लढा द्यावा लागेल. या लढा समाजातील सर्व घटकांचा समावेश आवश्यक आहे.
Files
32. Prof. Prakash Kothale.pdf
Files
(976.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:26227061797fe876beb20724e6215fb2
|
976.7 kB | Preview Download |