मुस्लीम समाजातील विधवांची परिस्थिती : एक अभ्यास
Authors/Creators
Description
सदर शोधनिबंधात मुस्लीम समाजात ज्या विधवा आहेत त्यांना पती निधनानंतर येणाऱ्या अडचणींचा अभ्यास केला आहे. सदर शोधनिबंधाचा उद्देश पती निधनानंतर सदर महिलेला समाजात कौटुंबिक जीवनात नोकरी करत असलेल्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा प्रत्यय येतो. शोधनिबंधाचा अभ्यास करत असताना संशोधन पद्धतीतील मुलाखतीचा वापर केला गेला आहे. अभ्यास करत असताना मुस्लीम समाजातील स्त्रियांची परिस्थिती भारतीय स्त्रिया व त्या संबंधातील चळवळी या विषयातील संशोधकाने संदर्भाचा अभ्यास केला आहे. मुस्लीम समाजातील विधवा स्त्रियांमध्ये शिक्षणाचा अभाव व इतर परिस्थिती असल्याने त्यांना स्वावलंबी होता आले नाही त्यामुळे जीवनातील बऱ्याच प्रशांना तोंड द्यावे लागते असा निष्कर्ष काढता येईल .