Published June 30, 2022 | Version v1

कोविड १९ चा भारतीय किरकोळ उद्योगावर झालेला परिणाम: एक अध्ययन

Description

कोरोनाव्हायरस रोगामुळे अनेक क्षेत्रावर व आपल्या जीवनावर प्रभाव पडला आहे. या महामारी मुळे ग्राहकांच्या किरकोळ खरेदीच्या वर्तनावर मोठा परिणाम झालेला दिसून येतो व सहाजिकच ग्राहकांच्या वर्तणुकीत झालेल्या बदलाचा परिणाम हा किरकोळ विक्री वर होतो त्यामुळे हा परिणाम कोणत्या कारणांमुळे होतो हे समजून घेण्याची गरज आहे. भारतीय किरकोळ बाजारपेठेचा आकार पूर्वीच्या तुलनेत वाढलेला दिसतो आहे आणि ही वाढ पुढेही होताना दिसते आहे . परंतु कोविड १९ चा ज्याप्रकारे अनेक क्षेत्रावर प्रभाव पडला आहे त्याच प्रमाणे किरकोळ क्षेत्रावरही त्याचा परिणाम झालेला दिसतो. कोविड १९ च्या काळात भारतातील किरकोळ क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्याचबरोबर पारंपारिक आणि संघटित विक्रेत्यांना अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. प्रस्तुत संशोधन विषयांमध्ये कोविड १९ च्या काळात किरकोळ उद्योगात झालेली वाढ किंवा घट तसेच कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला व कोणत्या संधी आहेत याचे विश्लेषण  केले जाणार आहे. यासाठी प्रकाशित अहवाल, जर्नल मधील शोध निबंधांचा वापर केला जाणार आहे.

Files

22. श्री अमोल भारत कवडे -May-June 2022.pdf