Published June 30, 2022 | Version v1

कोविड - १९ च्या काळात पोलीस आणि प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांनी अवलंबलेले ताणाचा सामना करण्याचे मार्ग

Description

कोविड-१९ रोगाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये, महाराष्ट्र हा रुग्ण संख्येच्या  बाबतीत केंद्रबिंदू बनला होता. भारतातील एकूण रुग्ण संख्येच्या सुमारे २२.३५ % रुग्ण व देशातील एकूण मृत्यूपैकी सुमारे ३०.५५ % मृत्यू हे महाराष्ट्रात झाले होते. या महामारीच्या तीव्रतेचे  पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर  मोठे आव्हान होते. ही प्रचंड आव्हाने पेलून त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना या अधिकाऱ्यांनी आपली प्रेरणा टिकवून ठेवली. तथापि पोलीस आणि  प्रशासनात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाची योग्य दाखल घेतली गेली नाही.

Files

21. डॉ. सुचरिता गद्रे, जयश्री नांगरे -May-June 2022.pdf