Published July 31, 2022 | Version v1

शेतमाल हमीभाव व शेतमालाच्या किंमतीचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम

  • 1. 1 मार्गदर्शक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री. मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, भेंडा. 2संशोधक , पद्व्युत्तर अर्थशास्त्र संशोधन केंद्र सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर

Description

गोषवारा –  शेतमालाच्या किंमती हा अतिशय संवेदनशील विषय आहे. अन्नधान्य, तेलबिया, ताग, कापूस इ. कृषिउत्पादने कोणत्या किंमतीला मिळतात, यावर लोकांचे वास्तव उत्पन्न अवलंबून असते. या वस्तू महाग झाल्या, तर लोकांचे राहणीमान खर्चिक बनत जाते. कापूस, ताग, ऊस असा कच्च माल महाग झाल्यास त्यानुसार कापड, साखर अशी जी औदयोगिक उत्पादने तयार होतात, त्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.शेतकऱ्यांच्या बाजूनेही या किंमतींचा विचार करावा लागतो. जर बाजारात शेतीउत्पादनास अगदी कमी किंमत मिळाली, तर शेतकऱ्यांच्या हातात फारसा नफा अगर वाढावा राहात नाही, अथवा या व्यवहारात त्यांचा तोटाही होऊ शकतो. शेतमालाच्या किंमती उच्च पातळीला गेल्या, तर शेतकऱ्यांचा फायदा होतो ; पण गाहकांना या वाढीव किंमतीचा फटकाही बसू शकतो.अनेक कृषिउत्पादने देशाच्या निर्यातीच्या यादीत समाविष्ट असतात. जर अशा उत्पादनांच्या किंमती उच्चपातळीला गेल्या, तर निर्यातीवरही अनिष्ट परिणाम होतो. शेतमालाच्या किंमतींमध्ये फार मोठे चढउतार असण्याचीही प्रवृत्ती आढळते. मुबलक पीक आले, तर या उत्पादनांच्या किंमती कोसळतात व अतिवृष्टीने किंवा अवर्षणाने पीक गेले, तर किंमती आकाशाला भिडतात, हा अनुभव सार्वत्रिक आहे. शेतमालाच्या किंमतींचा विचार सापेक्षतेनेही करावा लागतो. औदयोगिक मालाच्या किंमती वेगाने वाढत असतील व शेतमालाच्या किंमती तुलनेने अगदी सावकाश वाढत असतील, तर औदयोगिक क्षेत्रास अधिक सापेक्ष लाभ होत जातो. ही प्रकिया पुढे सामाजिक ताण व अन्याय वाढविण्यास कारणीभूत ठरते. म्हणून सरकारचा हस्तक्षेप या बाबतीत अटळ ठरतो.

Files

17...pdf

Files (384.3 kB)

Name Size
md5:a06ff55685ff0c4486963323e2b4865d
384.3 kB Preview Download