Published July 31, 2022 | Version v1

लोकप्रशासनातील आधुनिक विचारप्रवाहः नागरिकांची सनद

  • 1. देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

Description

गोषवारा: आज उदारीकरण व जागतिकीकरणातून निर्माण झालेली परिस्थिती आणि जनतेच्या मागण्यांना अनुरूप लोक प्रशासनावर पडणाऱ्या नवनवीन जबाबदाऱ्या व आव्हाने पेलण्यासाठी लोक प्रशासनात नवनवीन विचारप्रवाह अस्तित्वात आले आहेत. यामध्ये नवलोकप्रशासन, लोकनिवड दृष्ट्रीकोन, नवलोक व्यवस्थापन, नागरी समाज, नागरिकांची सनद, ई-प्रशासन आणि सुप्रशासन इत्यादी प्रवाह निर्माण झाले आहेत. हे सर्व प्रवाह प्रशासनात परिणामोन्मुखी, विकासात्मक स्वरूप असणारे प्रशासन, लक्ष्योन्मुखी व आधुनिकीकरणाच्या आव्हानास सामोरे जाणारे व त्याचा स्वीकार करणारे प्रशासन, त्याचबरोबर प्रजातांत्रिक मूल्यांशी संबंधित असलेले प्रशासन, प्रशासनात लवचिकतेवर भर देऊन सहभागी तत्त्वास प्राधान्य व  कार्यकुशलतेसह लोकांच्या इच्छांची पूर्तता, आर्थिक विकास साधणे, नवाचार आणि प्रभावी एकीकरण असलेली प्रगतशील प्रशासनाची निर्मिती करण्यासाठी वरील सर्व विचारप्रवाह प्रयत्नशील आहेत. कारण हे सर्व विचार प्रवाह  चांगले शासन (गुड गव्हर्नन्स) मध्ये समाविष्ट आहेत. म्हणून चांगले शासन निर्मितीसाठी आलेल्या विविध विचार प्रवाहात नागरिकांची सनद हा एक प्रमुख महत्त्वाचा विचारप्रवाह आहे.

Files

5.pdf

Files (454.3 kB)

Name Size
md5:6925f944ff31cb2da92bccc57178c0a8
454.3 kB Preview Download