Published January 20, 2016 | Version v1

सोलापूर जिल्हयातील सिध्दनाथ शुगर प्रा.लि.तिऱ्हे येथील ऊसतोड कामगारांच्या समस्या : एक भौगोलिक अभ्यास

Authors/Creators

Description

भूगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये कारखानदारी विषयास अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कारखानदारी भूगोलामध्ये अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. सोलापूर जिल्हा हे प्रदिर्घ ऐतिहासिक, धार्मिक वारसा असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयात अनेक उद्योग परंपरागत चालत आलेले आहेत. विशेषतः सोलापूरची चादर ही भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हयास ओळखला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील सिध्दनाथ शुगर मिल्स लि. तिरहे या साखर कारखान्याचा परीसरात आलेल्या ऊसतोड कामगांराच्या समस्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या संशोधन लेखामधून केला आहे. मानवाचा विकास हा पर्यावरणावर अवलंबुन असतो. पण कारखान्यांमुळे हवेचे प्रदुषण, ध्वनी प्रदुषण यासारख्या समस्या देखील निर्माण होतात. त्याचबरोबर ऊस तोडणीस दुसऱ्या जिल्हातून लोक येतात. यामध्ये विविध जिल्हयातून येणाऱ्या ऊसतोड कामगारमध्ये विविध वर्गातील लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणता समाज मागासलेला आहे हे समजण्यास मदत होते.

Files

सोलापूर जिल्हयातील सिध्दनाथ शुगर प्रा.लि.तिऱ्हे येथील ऊसतोड कामगारांच्या समस्या एक भौगोलि अभ्यास.pdf