Published October 31, 2025 | Version v1
Journal article Open

भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी आकलन

  • 1. द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा जि.रायगड

Contributors

Description

सारांश:

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण 2022 सालापासून साजरा करतो आहोत. 2025 हे वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वास्तविक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापेक्षाही भारतीय प्रजासत्ताकाचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीयांची स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाही प्रती असणाऱ्या संवेदना, बांधिलकी व भविष्याची दृष्टी व्यक्त करण्याच्या साठी महत्त्वाचा ठरतो. कारण 1950 च्या दशकात आफ्रिका व आशिया खंडातील बहुसंख्य देशांना स्वातंत्र्य मिळाले.परंतु मिळालेले ते स्वातंत्र्य बहुसंख्य देशांना टिकवता आले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळजवळ सर्वच देशांनी लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला मात्र त्या देशांमध्ये लोकशाही ही अतिशय अल्पकाळापुरतीच पाहुणी म्हणून राहिली व परत ते देश निरंकुश शासन पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रारूपांचे बळी ठरले.भारत हा एकमेव असा देश आहे ज्या देशाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रजासत्ताकाची स्थापना केली व हे प्रजासत्ताक आज दिमाखाने अमृत महोत्सवी वर्षांमध्ये  प्रवेशित झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतीय संविधानाचे यश, भारतीय संविधानाची वाटचाल व भारतीय प्रजासत्ताकाचे भविष्य या दृष्टीने सातत्यानं विचारमंथन,तत्वचिंतन, आकलन व समाजाच्या विविध स्तरांवर या दृष्टीने संवाद वृद्धिगत होणे महत्त्वाचं आहे. भारतीय संविधान हे केवळ एक नियमांचे पुस्तक नव्हे किंवा कायद्यांची चौकट नव्हे तर तो आपल्या क्रांती नायकांनी आपल्या हाती दिलेला एक क्रांतिकारी दस्तऐवज आहे. हा क्रांतिकारी दस्तऐवज दोन वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांच्या कालावधीत भारतीय संविधान सभेने मूर्त स्वरूपात आणला असला तरी त्याचे संचित एवढ्या पुरते मर्यादित करून चालणार नाही. त्याचा तत्व वैचारिक स्त्रोत बुद्धकालीन गणराज्यापासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंत भारतीय समृद्ध विचार परंपरांना आपल्या कवेत घेतो. तर संरचनात्मक स्त्रोत ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटी पासून भारतीय स्वातंत्र्य कायद्यापर्यंत आपला उगम दाखवीतो. आपला परिप्रेक्ष 60 पेक्षा अधिक देशांच्या राज्यघटनेच्या अभ्यासातून मानवी हक्कांच्या सनदे पर्यंत विकसित करतो. अशा पद्धतीने भारतीय संविधान हे सभोवतालच्या परिस्थितीतून जे जे सकस आहे ते आत्मसात करत आकाराला तर आलेच त्याचबरोबर जगभरातील विविध संविधानातील मूलभूत तत्त्वांनाही त्यांनी आपल्या कवेत घेतले व सबंध जगाला मार्गदर्शन करू शकेल असे संविधानाचे प्रारूप तयार झाले.

Files

x171024.pdf

Files (419.3 kB)

Name Size Download all
md5:7a35eb992a2048e0d7fefb698f261880
419.3 kB Preview Download