Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

आदिवासींच्या विकासात आदिवासी विकास योजनांचे महत्व एक अभ्यास

  • 1. स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड.
  • 2. आदर्श महाविद्यालय, हिंगोली. जि. हिंगोली.

Description

आदिवासी विकास योजनांचा उद्देश आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना प्रदान करणे आहे. भारतीय समाजातील आदिवासी लोक शारीरिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विविध आव्हानांचा सामना करतात. त्यांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक भौगोलिक परिस्थितीमुळे, त्यांना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या विकास योजनांच्या माध्यमातून आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू केले जातात. यामध्ये शालेय शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सेवा, कृषी विकास, वनश्रीविकास आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम यांचा समावेश असतो. आदिवासी विकास योजनांचा प्रभावी कार्यान्वयन केल्यास आदिवासी समुदायाला स्वयंपूर्णता, आत्मविश्वास आणि समृद्धीची दिशा मिळवता येईल. त्यामुळे, आदिवासी विकासाच्या योजना केवळ आर्थिक दृष्टीने नाही तर सामाजिक सांस्कृतिक स्तरावर देखील महत्त्वपूर्ण ठरतात. अशा रीतीने, आदिवासी विकास योजनांचा समर्पक उपयोग आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. आदिवासींच्या विकासाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या १९७६ च्या जी.आर. नुसार महाराष्ट्र सरकारने //१९७६ पासुन आदिवासी उपयोजना लागू केली खात्रीची उपयोजना म्हणून १९७६-७७ पासुन अंदाजपत्रकाप्रमाणे प्रत्येक मुख्य शिर्षाखाली "जनजाती क्षेत्र उपयोजना" हे वेगळे गौणशिर्ष सुरू करण्यात आले. प्रस्तुत शोधनिबंधाचा आदिवासी उपयोजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कायक्रमाअंतर्गत आदिवासींचा अपेक्षित विकास साध्य करता आला काय? त्यांच्या सामाजिक-आर्थिक सांस्कृतिक बदलांवर काय परिणाम घडून आला? हे अभ्यासणे यथायोग्य निष्कर्ष मांडणे हा प्रमुख उद्देश आहे.

Files

S064039.pdf

Files (875.2 kB)

Name Size Download all
md5:dad2a9528117748c42bd78cde7059f91
875.2 kB Preview Download