Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

जननायक बिरसा मुंडा यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

  • 1. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको, नवीन नांदेड.

Description

डोंगर दर्यात आणि जंगलात आदिवासी लोक हजारो वर्षापासून आनंदाने आपल्या संस्कृतीची जोपासना करत आपले जीवन जगत आलेले होते. ब्रिटिशांनी जंगल कायदा करून हजारो वर्षाची आदिवासींची चांगली व्यवस्था मोडली. मूलनिवासी असलेल्या आदिवासी समाजाला आपल्या जमीन हक्क अधिकारापासून वंचित केले, यातून मुक्तता मिळविण्यासाठी जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासींना एकत्र करून आपले हक्क अधिकार मिळण्यासाठी इंग्रजा विरुद्ध बंड पुकारून सशस्त्र लढा दिला. त्यांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. उलगुलान आंदोलन करून आदिवासींचे अस्तित्वाची जाणीव ब्रिटिशांना करून दिली. तसेच त्यांनी आदिवासी समाजात अंधश्रद्धा निर्मूलन करून सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपले युवा अवस्थेत ब्रिटिशांच्या सोबत युद्ध केले. भूमिगत राहून स्वातंत्र्याची आंदोलन चालवले म्हणून त्यांना धरती आबा असे म्हणतात हा महान स्वातंत्र्य योद्धा आजअमर भारतात झाला.

Files

S064025.pdf

Files (662.3 kB)

Name Size Download all
md5:e338191bd47ec462db8bb0461d1911c8
662.3 kB Preview Download