Published November 20, 2025 | Version v1
Journal article Open

आदिवासींची लोक संस्कृती व जीवनमूल्य

  • 1. बलभीम महाविद्यालय बीड.

Description

9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा, नृत्य, गायन करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा माणूस पृथ्वीवर सर्वत्र फिरू लागला प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळून घेतले. हळू हळू शब्द , बोली, पुढे भाषा संवाद अशी उत्क्रांती होत गेली. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात आणि जमाती आपली बोलीभाषा, रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत. आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत. अनेक वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर जी बाब समोर आली ती अतिशय धक्कादायक होती. ती बाब म्हणजे जगातील अनेक मूळनिवासी समूहाने निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले आहे. परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अनेक सोयी सुविधा पासून वंचित राहिले आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला.

Files

S064023.pdf

Files (662.6 kB)

Name Size Download all
md5:73aa9abdc420e14e3a7b92e0dba3f043
662.6 kB Preview Download